बुलढाण्यात एक खळबळजनक घटना घडली. शेतीच्या वादातून मुलाने आई आणि बापाचा खून केल्याची धक्कादायक घटना बुलढाण्यात घडली. मुलाने दारूच्या नशेत जन्मदात्या आई आणि बापाची कुऱ्हाडीने वार करत हत्या केली. त्यानंतर त्याने स्वत: गळफास घेऊन आयुष्याचा दोर कापला. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली.
सावरगाव येथील विशाल डुकरे या ३२ वर्षीय तरुणाने शेतीच्या वादातून स्वतःच्याच आई वडिलांची कुऱ्हाडीने वार करत हत्या केलीय. त्यानंतर त्याने आत्महत्या केली. मृतांमध्ये वडील सुभाष दिगंबर डुकरे (६७), आई लता सुभाष डुकरे (५५) आणि मुलगा विशाल सुभाष डुकरे (३२) यांचा समावेश आहे. चिखली पोलिसांनी दाखल होत पंचनामा केला.
मृतक आरोपी विशालचा मोठा भाऊ शरद पाटील यांचा युवराज नावाचा ११ वर्षाचा मुलगा व आर्या नावाची ६ वर्षाची मुलगी. या दोन्ही चिमुकल्यांना आजी-आजोबांचा मोठा लळा होता. रोज सायंकाळी ते आजी-आजोबांकडे झोपायला जात. सुदैवाने गेल्या दोन-तीन दिवसांपासून ते आजोबा-आजीकडे गेले नव्हते. घटनेच्या वेळी या दोन्ही चिमुकल्यांच्या अनुपस्थितीने त्यांच्यावरील संकट टळले..
मिळालेल्या माहितीनुसार, विशाल लहानपणी हुशार होता, शाळेत पहिला यायचा. पण हळूहळू तो बिघडत गेला. कामधंदा सोडून दारूच्या नशेत दिवस घालवू लागला. आई-वडिलांना शिवीगाळ, मारहाण हे रोजचं झालं. या व्यसनामुळे त्याचं लग्न मोडलं, मित्र दूर झाले आणि घरातली शांतता कायमची हरवली. चिखली घटनास्थळी पोलिसांनी दाखल होत पंचनामा केला.