महाविकास आघाडीला मोठं खिंडार!
महाविकास आघाडीला मोठं खिंडार! "या" ठिकाणी अनेक पदाधिकारी , सरपंचांचा भाजपात प्रवेश
img
Dipali Ghadwaje
महाविकास आघाडीला मोठा धक्का देणारी बातमी आहे.  बुलडाण्यात महाविकास आघाडीला मोठी खिंडार पडत आहे. अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. आपल्या पदाचे राजीनामे देत त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे.

चिखली विधान सभा मतदारसंघात आ. श्वेता महाले यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या विस्ताराला एक नवा आयाम मिळाला असून विधानसभा निवडणुकीतील सलग दुसऱ्या विजयानंतर आ.महाले यांच्या नेतृत्वाला अधिक लोकमान्यता मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

त्यामुळे अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. यासह बऱ्याच गावातील आजी - माजी सरपंच व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला आहे . त्यामुळे जिल्हतातील महाविकास आघाडीला गळती लागल्याचे चित्र दिसत आहे.

अनेक पदाधिकारी, नेते आणि सरपंचांच्या भाजपमध्ये प्रवेशाने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. यामुळे जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे वर्चस्व संपुष्टात येऊ शकते. अनेकांनी उद्धव ठाकरे गट, शरद पवार आणि काँग्रेसची साथ सोडली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group