वीज ग्राहकांसाठी सुखद बातमी! १०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांना २६% दर कपात ;  मुख्यमंत्र्यांची घोषणा
वीज ग्राहकांसाठी सुखद बातमी! १०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांना २६% दर कपात ; मुख्यमंत्र्यांची घोषणा
img
Dipali Ghadwaje
मुंबई : महाराष्ट्रात औद्योगिक वीजदर अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वांत कमी होणार आहेत. आधीच्या टॅरिफ पिटिशनमध्ये रहिवासी ग्राहकांवर भार टाकून इंडस्ट्रियल आणि कमर्शियल दर कमी केले गेले. त्यावर आक्षेप घेतल्याने सगळ्याच कॅटेगरीचे दर कमी झाले आहेत.

दरम्यान राज्यात १०० युनिटखाली विजेचा वापर करणारे ७० टक्के ग्राहक असून, त्यांना २६ टक्के दरकपात मिळणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली.
 
‘मेरिट ऑर्डर डिस्पॅच’ पद्धतीने विद्युत खरेदी केली जाणार असल्यामुळे खासगी कंपन्यांकडून स्वस्त दरात वीज खरेदी केली जाते.

सोलर, विंड आणि बॅटरी स्टोअरेजच्या वापरामुळे विजेच्या खरेदीची किंमत मोठ्या प्रमाणात घटली आहे. हे करार २५ वर्षांचे असल्यामुळे विजेचे दर स्थिर राहतील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

नवीन टॅरिफनुसार सध्या महाराष्ट्राचा दर ८.३२ रुपये असून, तो पुढील टप्प्यात ७.३८ रुपयांवर येणार आहे. टॅरिफ ट्रू-अप प्रक्रियेमुळे वीज दर वाढणार नाहीत. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group