अजितदादांची अकाली एक्झिट ! राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर, CM फडणवीस म्हणाले, कधीही भरून न निघणारे नुकसान...
अजितदादांची अकाली एक्झिट ! राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर, CM फडणवीस म्हणाले, कधीही भरून न निघणारे नुकसान...
img
वैष्णवी सांगळे
आज सकाळची सुरुवात संपूर्ण महाराष्ट्रसाठी मोठी धक्कादायक ठरली आहे. उपमुख्यमंत्री आणि धडाडीचे नेते म्हणून ओळख असणारे अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. आज सकाळी बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये अजित पवारांसह ५ जणांचा मृत्यू झाला. अजित पवारांसह मुंबई पीएसओ HC विदीप जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन संभवी पाठक, पिंकी माळी, फ्लाईट अटेंडंट होते. या सर्वांचा यात मृत्यू झाला आहे. 

प्रशासनावर वचक, राजकारणात दबदबा, कशी होती उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राजकीय कारकीर्द

लोकनेता हरवल्याची भावना
अजित पवार यांच्या मृत्यूनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त करत लोकनेता हरवल्याची भावना व्यक्त केली आहे. तसेच राज्यामध्ये आज शासकीय सुट्टीसह तीन दिवसांचा दुखवटाही जाहीर करण्यात आला आहे. 

अजित पवार महाराष्ट्रातले लोकनेते होते, महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण असलेले नेते होते. अशा प्रकारचे नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्ष लागतात. त्यांचं निघून जाणं हे अविश्वसनीय आहे, मनाला चटका लावणारे आहे. माझ्यासाठी वैयक्तिक एक दमदार आण दिलदार मित्र सोडून गेला आहे. मी आणि एकनाथ शिंदे लवकरच बारामतीला निघणार आहोत. पंतप्रधान,गृहमंत्री यांच्याी चर्चा करून त्यांनाही घडलेल्या घटनेची कल्पना दिली आहे. त्यांनीही प्रचंड दुख व्यक्त केले आहे. संपूर्ण देशात या घटनेमुळ हळहळ पसरली आहे. पुढील गोष्टी परिवाराशी चर्चा करून ठरवण्यात येतील."

"संपूर्ण पवार कुटुंब बारामतीला पोहोचल्यानंतर त्यांच्या संमतीने पुढचे निर्णय घेतले जातील. महाराष्ट्रात आज शासकीय सुट्टी घोषित केली आहे. तीन दिवसांचा दुखवटा देखील जाहीर केला आहे."  हे कधीही भरून न निघणारे नुकसान आहे. लोकनेते निघून गेल्यानंतर पोकळी निर्माण होते, ती भरून काढणे कठीण आहे.  संघर्षाच्या काळात आम्ही एकत्र काम केलं आहे. या घटनेवर विश्वास ठेवण्यास मन तयार होत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group