एकनाथरावांचं माहिती नाही पण मी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार... अजित पवारांच्या आठवणी सांगताना एकनाथ शिंदे गहिवरले
एकनाथरावांचं माहिती नाही पण मी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार... अजित पवारांच्या आठवणी सांगताना एकनाथ शिंदे गहिवरले
img
वैष्णवी सांगळे
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज सोमवारी सुरुवात झाली. अधिवेशनाच्या प्रथेप्रमाणे पहिल्या दिवशी विधिमंडळाच्या सदस्य असलेल्या दिवंगत नेत्यांना आदरांजली वाहण्यासाठी शोक प्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला. 

एकनाथ शिंदे काय म्हणाले ? 
अधिवेशनाचा आज पहिला दिवस. गेली 22-23 वर्ष काम करत असताना आजचा दिवस सर्वांसाठी प्रचंड दुःखाचा दिवस आहे. आपल्या एका सहकाऱ्याबाबत बोलण्याची वेळ येणे हे दुःखद आहे. आज त्यांची पावलोपावली उणीव भासत आहे. काल पत्रकार परिषदेला ते नव्हते. शिव जयंतीला देखील ते नव्हते, आज सभागृहात देखील ते नाही. हे दुःखद आहे. 

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, प्रचंड अभ्यासू, प्रशासनावर पकड असणारा हा नेता होता. त्यांनी हातात फाईल घेतली की काय कमी आहे हे लगेच ते सांगायचे. बैठकीत साधा कागदाचा तुकडा पडला तरी ते त्यांना चालत नव्हते. ते कधीच नकारात्मक बोलत नव्हते. कोरोना काळात ते मंत्रालयात जाऊन काम करत होते. त्यांच्यासोबत काम करताना काही घटना आठवतात. सरकार स्थापनेच्या चर्चा सुरू असताना आम्ही पत्रकार परिषद घेत होतो. त्यावेळी त्यांनी माझ्या हातातून माईक घेतला आणि म्हणाले एकनाथरावांचं माहिती नाही पण मी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. लाडकी बहीण योजना राबवायची आहे. आमच्या तिघांचं एकमत झालं. राज्याचा आर्थिक गाडा व्यवस्थित सांभाळला. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा आपल्याला फायदा होत होता. अधिवेशन काळात ते पूर्णवेळ थांबायचे. विरोधी पक्षाच्या प्रश्नांना उत्तर द्यायचे. कामात कधीच तडजोड करत नव्हते, असे देखील त्यांनी म्हटले. 

राजकारणात मतभेद असतात, वाद असतात. मात्र, ते अजात शत्रू होते. त्यांनी राजकारणात खिलाडूपणा कायम जपला. माझा आणि त्यांचा राजकीय प्रवास समांतर होता. जनतेच्या न्यायालयात आम्ही घेतलेला निर्णय योग्य ठरला. अधिकाऱ्यांना पहाटे पाच वाजता ते बोलवायचे. अधिकाऱ्यांची फरफट होत होती. मात्र, आमचं सरकार 24/7 काम करणारं सरकार होतं. दादा त्यांच्या विधानाने काहीवेळा अडचणीत आले. मात्र, त्यांनी परिणामांची पर्वा केली नाही. त्यांनी पहाटेचा शपथविधी केला. त्यांच्या अंगावर सगळा विषय आला. मात्र, ते मागे हटले नाहीत, अशी आठवण एकनाथ शिंदे यांनी करून दिली.


इतर बातम्या
Join Whatsapp Group