सुप्रिया सुळे यांचे नवे व्हॉट्सअप स्टेट्स,अजित पवार यांच्यासोबतचा फोटो, एका शब्दात कॅप्शन देताना म्हटले...
सुप्रिया सुळे यांचे नवे व्हॉट्सअप स्टेट्स,अजित पवार यांच्यासोबतचा फोटो, एका शब्दात कॅप्शन देताना म्हटले...
img
वैष्णवी सांगळे
अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहे. अजितदादांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अजित पवारांच्या निधनानंतर आता अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत, याची आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत सुप्रिया सुळे यांनीही तेच विधान केले. त्यामुळे राज्याचे राजकारण आणि पवार कुटुंबातील संबंध वेगळ्याच वळणावर असल्याचे चित्र आहे. 

विषारी पदार्थ खाल्ल्याने ४ मैत्रिणींचा मृत्यू , एक गंभीर; हत्या की आत्महत्या पोलिसांकडून तपास सुरु

सुप्रिया सुळे या सध्या दिल्लीत आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर त्या सतत व्हॉट्सअप स्टेट्स अजित पवार यांच्या संबंधित ठेवत आहेत. सुप्रिया सुळे यांनी एक नवीन व्हॉट्सअप स्टेट्स ठेवले. ज्यामध्ये त्यांनी अजित पवार यांच्यासोबतचा जुना फोटो शेअर केला. या फोटोमध्ये सुप्रिया सुळे या अजित पवार यांच्यासोबत दिसत आहेत. हा फोटो शेअर करताना सुप्रिया सुळे यांनी खास कॅप्शनही दिले. सुप्रिया सुळे यांनी @ बारातमी…… असे कॅप्शन दिले आहे.

या व्हॉट्सअप स्टेट्सच्या माध्यमातून काहीतरी मोठे संकेत देताना सुप्रिया सुळे या दिसत आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या पण आता खंड पडल्याचे मोठे विधान स्वत: शरद पवार यांनी केले. अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये पक्षाच्या विलिगीकरणाबद्दल चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले. मात्र, याला राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांनी नकार दिलाय. अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचेही त्यांनी सांगितले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group