खळबळजनक ! अजित पवारांचा मृत्यू, काही तासात 'त्या' ७५ फाईलींवर सह्या करण्यास सुरुवात
खळबळजनक ! अजित पवारांचा मृत्यू, काही तासात 'त्या' ७५ फाईलींवर सह्या करण्यास सुरुवात
img
वैष्णवी सांगळे
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनानंतर राज्यात शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला मात्र याच दरम्यान राज्यात मोठा गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यात शासकीय दुखवट्याचे वातावरण असतानाच अल्पसंख्याक विभागाकडून ७५ शिक्षण संस्थांना घाईघाईने अल्पसंख्यांक दर्जा देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

विशेष म्हणजे, अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर अवघ्या काही तासांतच ही प्रमाणपत्रे देण्यास सुरुवात झाल्याचे देखील उघड झाले आहे. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यापासून अल्पसंख्यांक दर्जाची प्रमाणपत्रे देण्यास स्थगिती देण्यात आली होती. मात्र, अजित पवार यांच्या निधनानंतर ही स्थगिती डावलून मंत्रालयातून गुपचूपपणे प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, पहिले प्रमाणपत्र 28 जानेवारी रोजी, अजित पवार यांच्या अपघाताच्या दिवशीच दुपारी 3 वाजून 9 मिनिटांनी देण्यात आले. राज्यात शासकीय दुखवटा सुरू असताना मंत्रालयात ही प्रक्रिया कशी आणि कोणाच्या आदेशाने राबवली गेली, असा सवाल उपस्थित होत आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यात शासकीय दुखवट्याचे वातावरण असतानाच अल्पसंख्याक विभागाकडून 75 शिक्षण संस्थांना घाईघाईने अल्पसंख्यांक दर्जा देण्यात आले.

मागील वर्षी ऑगस्ट महिन्यापासून अल्पसंख्यांक दर्जाची प्रमाणपत्रे देण्यास स्थगिती देण्यात आली होती. मात्र, अजित पवार यांच्या निधनानंतर ही स्थगिती डावलून मंत्रालयातून गुपचूपपणे प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आल्याचा आरोप होत आहे.  यावरुनच रोहित पवार यांनीही संताप व्यक्त केला आहे. "सर्वच वंगाळ झालंय, माणसाची काही किंमत आहे कि नाही ? थोड्या फार तर भावना, संवेदना असायला हव्यात की नाही ?" असं त्यांनी म्हटले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group