राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारी २०२६ ला सकाळी पावणे नऊ वाजेच्या सुमारास विमान अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या निधनानंतर सामाजिक आणि राजकीय वर्तुळातून देखील अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. आज राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. राज्याचा हा अर्थसंकल्प अजित पवार मांडणार होते, या अर्थसंकल्पाची तयारीही ते मागील काही दिवसांपासून करत होते. मात्र, त्यांच्या निधनानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा अर्थसंकल्प मांडणार आहे.
विमान अपघातावर रोहित पवार यांच्यासह अमोल मिटकरी अनेक खळबळजनक दावे करत आहे. रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अनेक गंभीर प्रश्न या अपघातावर उपस्थित केले आहेत. यादरम्यानच आता अमोल मिटकरी यांनी देखील अत्यंत खळबळ उडवणारा दावा केला.
अमोल मिटकरी यांनी म्हटले की, अजित पवार यांच्या विमान अपघातावेळी पायलट सुमित कपूर हा ,सुसाईड बॉम्बर होता का? लिट्टेने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या केली तशीच किंवा त्याप्रकारेच अजित पवार यांची हत्या झाली का? सुमित कपूर यांच्या पत्नी सुमित हा जिवंत असल्याचे म्हणताना दिसत आहेत.मग खरोखरच विमान अपघातात सुमित कपूर यांचे निधन झाले का? असेही अमोल मिटकरी यांनी म्हटले.
यासोबतच त्यांनी अजित पवार यांच्या विमानाचे अगोदरच ठरलेले पायलट साहिल मदन आणि कॅप्टन यश हे खरोखरच वाहतूककोडींत अडकले होते का? असाही थेट प्रश्न केला. ब्लॅक बॉक्सचे जाऊन द्या सध्या पण सीसीटीव्ही फुटेज का देत नाहीत, असेही अमोल मिटकरी यांनी म्हटले.आता अमोल मिटकरी यांनी केलेल्या दाव्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. अजित पवार यांच्या विमानाचे सुरूवातीला ठरवून दिलेले दोन्ही पायलट कुठे आहेत? हा प्रश्न सध्या सातत्याने उपस्थित केला जात आहे.