उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. मुंबईहून बारातमीला अजित पवार प्रचार सभेसाठी जात होते. दरम्यान, बुधवारी २८ जानेवारी रोजी बारामतीजवळ झालेल्य विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला.
२८ जानेवारी रोजी त्यांच्या बारामतीमध्ये ४ सभा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीनिमित्त होत्या. अजित पवार बारामतीमध्ये येत असल्याने कार्यकर्ते विमानतळावर पुष्पगुच्छ घेऊन त्यांची वाट पाहत होते. मात्र, विमानतळाच्या काही अंतरावरच अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला या अपघातात दादांसह इतर पाच जणांचाही जीव गेला आहे. या विमान अपघाताची चाैकशी देखील सुरू आहे.
अपघाताची बातमी समोर येताच संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. घटनेच्या दिवशी बारामती विमानतळ परिसरात दाट धुकं असल्याने हा अपघात झाला असावा, अशी माहिती सुरुवातीला समोर आली होती. याबाबत विविध संशयही व्यक्त करण्यात येत होते. आता घटनेच्या ९ दिवसानंतर अजित पवारांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे.
या अहवालात अजित पवारांच्या विमान अपघाताची दोन प्रमुख कारणं देण्यात आली आहेत. विमानातील तांत्रिक बिघाड आणि वैमानिकाचा चुकलेला अंदाज या दोन प्रमुख कारणांमुळे हा अपघात झाला असल्याचं प्राथमिक तपासात दिसून आलं आहे.