Ajit Pawar Plane Crash: पायलटने अजितदादांचं विमान मुद्दाम खाली आपटलं अन्...  रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
Ajit Pawar Plane Crash: पायलटने अजितदादांचं विमान मुद्दाम खाली आपटलं अन्... रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
img
वैष्णवी सांगळे
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावर रोहित पवार यांच्याकडून खळबळजनक दावे करण्यात येत आहे. बुधवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी पुन्हा एकदा खळबळजनक आरोप केला आहे. यावेळी त्यांनी विमानाचा पायलट सुमित कपूर आणि व्हीएसआर कंपनीवर गंभीर आरोपही केले.

रोहित पवार काय म्हणाले ? 
मुंबईवरुन बारामतीला जाण्यासाठी फार इंधनाची गरज नव्हती. तरीही अजितदादांच्या विमानाच्या पंखातील इंधनाच्या टाक्या पूर्णपणे भरण्यात आल्या होत्या.  या विमानात अपघाताच्या वेळी 3000 ते 3500 लीटर इंधन होते. एवढेच नव्हे तर विमानाच्या टॉयलेटजवळ इंधनाचे अतिरिक्त कॅनही ठेवले होते. या सगळ्यात पायलटचा वापर करुन अजित पवार यांच्या विमानाचा अपघात घडवण्यात आला, असे आम्हाला वाटते. विमानात जास्त इंधन असेल तर मोठा स्फोट होईल, हा आमचा संशय खरा ठरताना दिसत आहे. बारामतीच्या धावपट्टीवर उतरण्यासाठी दृश्यमानता कमी असूनही पायलट सुमित कपूर यांनी माघारी न फिरता एक गिरकी घेऊन विमान खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. किंबहुना त्यांनी विमान मुद्दाम खाली आदळले आणि स्फोट घडवून आणला, असा आरोप रोहित पवार यांनी केला. 

यावेळी रोहित पवार यांनी व्हीएसआर या विमानसेवा देणाऱ्या कंपनीवरही गंभीर आरोप केले. व्हीएसआर कंपनीचा गोपी नावाच हँडलर मुंबईत बसतो. तो फ्लाईट प्लॅनमध्ये फेरफार करु शकतो. माझ्या माहितीनुसार, सध्या तपास सुरु असून व्हीएसआर कंपनीकडून कागदपत्रे मिळण्यात विलंब होत आहे. कारण, व्हीएसआर कंपनीकडून सध्या कागदपत्रांमध्ये फेरफार करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दिल्लीवरुन फ्लाईट प्लॅन आल्यानंतर हँडलर गोपीने त्यामध्ये बदल केले असावेत. त्यामुळे याप्रकरणाची चौकशी करताना त्यावेळी पाठवण्यात आलेले ई-मेल तपासावेत, असे रोहित पवार यांनी म्हटले. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group