शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट , अजितदादांची इच्छा होती १२ तारखेला...
शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट , अजितदादांची इच्छा होती १२ तारखेला...
img
वैष्णवी सांगळे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. उपमुख्यमंत्री पदी कोण असणार ? दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण होणार का ? याबाबत चर्चा रंगत होत्या. दरम्यान आज राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या शपथ घेणार आहेत. अशातच राज्याच्या राजकारण्याच्या घडामोडींबाबत बारामतीमध्ये पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी भाष्य करत मोठा गौफ्यस्फोट केला आहे. 

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा झाली होती. आणि १२ तारखेला निर्णय जाहीर होणार होता, असा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांनी केलाय प.. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात अशी अजितदादांची इच्छा होती आणि आमचीही इच्छा होती.. असंही शरद पवारांनी म्हटलंय.. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का, यावर त्यांनी स्पष्ट मत मांडले.

अजितदादादा आणि जयंत पाटील यांच्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र याव्यात यावर चर्चा सुरू होती. मी या चर्चेत नव्हतो. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा निर्णय १२ तारखेला जाहीर होणार होता, पण अजित पवार यांचं अपघाती निधन झाले, आता चर्चेला खंड पडला, असा गौप्यस्फोटही शरद पवारांनी केला. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात अशी अजितदादांची इच्छा होती आणि आमचीही इच्छा होती असेही ते म्हणाले

सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, मी सकाळी वाचले, मला याबाबत कोणतीही कल्पना नाही, अजितदादा पक्षाची जबाबदारी सांभाळत होते, ते गेले आता कुणीतरी पुढे यायला पाहिजे. त्यामुळे पक्षाने निर्णय घेतला असेल. पक्ष त्यांचा आहे, त्यांच्या पक्षाने जे काही ठरवलं त्याची प्रचीति दिसत आहे. आमचा मार्ग वेगळा आहे. परिवार हा साथ देण्यासाठी बाकी राजकारण वेगळं, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, शरद पवारांना पत्रकारांनी शपथविधीला जाणार का? असा सवाल केला, त्यावर बोलताना ते म्हणाले की, शपथविधीसोहळ्याबाबत काहीही माहिती नाही. मी तर इथे (बारामतीत) आहे, मग कसा जाणार?
इतर बातम्या
Join Whatsapp Group