अजित पवारांची बारामती सुनेत्रा पवारांच्याच हाती; बैठकीत मोठा निर्णय
अजित पवारांची बारामती सुनेत्रा पवारांच्याच हाती; बैठकीत मोठा निर्णय
img
वैष्णवी सांगळे
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकस्मात निधनामुळे बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली असून याच पोटनिवडणुकीची तयारी निवडणूक आयोगातर्फे सुरू करण्यात आली आहे. बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा उमेदवार ठरला असल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या बारामती पोटनिवडणूक लढणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये ही पोटनिवडणूक लढण्यावर एकमत झालं आहे. 

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीची तयारी निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. या विधानसभा मतदारसंघासाठी विशेष संक्षिप्त मतदारयादी पुनर्परीक्षण कार्यक्रम आयोगाने जाहीर केला असून 1 जानेवारी 2026 पर्यंत नाव नोंदवलेले मतदार या पोटनिवडणुकीत मतदान करू शकणार आहेत. या मतदारसंघासाठी 10 मार्चला अंतिम प्रारुप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारावर शिक्कामोर्तब झाला आहे. 

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामती पोटनिवडणूक लढवणार असल्याची माहिती आता समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत पोटनिवडणूक लढण्यावर सर्वांचं एकमत झालं आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी निवडणुकीची घोषणा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बारामती निवडणूक बिनविरोध करण्यावर भर असणार आहे. त्यामुळे आता बारामतीची धुरा ही सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर असणार आहे. विधासभेची पोटनिवडणूक त्या लढताना दिसतील.


इतर बातम्या
Join Whatsapp Group