मोठी बातमी : सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्ष
मोठी बातमी : सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्ष
img
वैष्णवी सांगळे
मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत नवीन राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची औपचारिक घोषणा करण्यात आली. ही बैठक वरळी येथील NSCI डोम येथे बोलावण्यात आली होती. माजी अध्यक्ष अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रीय अध्यक्षपद रिक्त झाले होते. त्यानंतर सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्षा करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती. राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचे नावही चर्चेत होते, परंतु राज्य आणि केंद्रीय कार्यकारिणीने सुनेत्रा पवार यांच्या नावावर एकमताने सहमती दर्शवली आहे.

अजित पवार यांच्या जाण्याने नुकसान झालं. अजित पवारांमुळे राज्यात आणि देशात आपली ओळख निर्माण झाली होती, सामान्य कुटुंबातून ते आले होते. 2023 मध्ये अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष झाले, हे सांगण्यात मला कोणतीही अडचण नाही, असे म्हणत राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या बैठकीत सुनेत्रा पवारच राष्ट्रीय अध्यक्ष असल्याची घोषणाही करण्यात आली. पटेल यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत याबाबतचा प्रस्ताव मांडला, त्याच सर्वानुमते सहमती दर्शवण्यात आली. 

दरम्यान, राष्ट्रवादीच्या बैठकीसाठी सुनेत्रा पवार, सुनील तटकरे, प्रफुल पटेल, पार्थ पवार, रुपाली चाकणकर छगन भुजबळ यांच्यासह अनेक नेते व पदाधिकारी उपस्थित होते. 


इतर बातम्या
Join Whatsapp Group