राष्ट्रवादी काँग्रेसच्या
राष्ट्रवादी काँग्रेसच्या "या" माजी मंत्र्याला ब्रेन स्ट्रोक, नाशिकमध्ये उपचार सुरू
img
DB

 राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि माजी मंत्री मधुकरराव पिचड यांची प्रकृती खालावली आहे. मधुकर पिचड यांची तब्येत अत्यवस्थ झाली आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास त्यांना ब्रेनस्ट्रोक आला. राजूर येथील राहत्या घरी असताना पिचडांना ब्रेनस्ट्रोक आला.

मधुकरराव पिचड 84 वर्षांचे आहेत. प्रकृती खालावल्यानंतर मधुकरराव पिचड यांना नाशिकच्या 9 पल्स रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मधुकरराव पिचड यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना अर्धांगवायू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मुलगा वैभव पिचडांसह संपूर्ण कुटुबीय सध्या रूग्णालयात आहेत.

नक्की वाचा >>>> आजपासूनच आचारसंहिता लागणार म्हणजे नेमकं काय होणार? सर्वसामान्यांसाठी काय नेमकं बदलणार?


इतर बातम्या
Join Whatsapp Group