अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात अनेक गणित बदलली आहे. राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहे. सुनेत्रा पवार यांनी आज महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. याआधी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या विधीमंडळ पक्षनेता म्हणून निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्यासाठी २ ठराव पास करण्यात आले. खासदार सुनिल तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली.
कोणते २ ठराव पास ?
१) . सुनेत्रा अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधीमंडळ पक्षनेतापदी एकमताने निवड करण्यात आली.
२). सुनेत्रा अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विधानमंडळ पक्षनेता म्हणून व्हीप काढणे आणि विधीमंडळ कामकाज पार पाडण्यासाठी असलेले इतर सर्व संविधानिक अधिकार देण्यात येत आहेत.
महाराष्ट्र विधिमंडळ पक्ष नेतेपदी सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड करण्यात यावी आणि विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबतचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार सुनेत्रा पवार यांना देण्याबाबतचे हे दोन ठराव छगन भुजबळ यांनी मांडले. या दोन्ही ठरावास हसन मुश्रिफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, नरहरी झिरवाळ, संजय बनसोड यांनी अनुमोदन दिले.