छगन भुजबळांची नाराजी दूर करण्यासाठी , अजित पवार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
छगन भुजबळांची नाराजी दूर करण्यासाठी , अजित पवार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
img
Dipali Ghadwaje
राज्य मंत्रिमंडळ विस्तारानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ  जाहीरपणे नाराजी व्यक्त करत आहेत. मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच नागपुरात सुरु असलेलं हिवाळी अधिवेशन सोडून छगन भुजबळ नाशिकला गेले. तसेच पुढील अधिवेशनात सहभागी होणार नसल्याचं देखील छगन भुजबळ यांनी जाहीर केले. 

दरम्यान छगन भुजबळांच्या या नाराजीनंतर आता त्यांची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे लवकरच छगन भुजबळांची भेट घेणार आहेत. भेटीची तारीख अद्याप ठरली नाही.

मात्र तिन्ही नेते नाशिक मधे जाऊन भेट घेण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे छगन भुजबळांची नाराजी दूर करण्यात अजित पवारांना यश येणार का?  याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.  

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group