अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारावेळी मोठी दुर्घटना टळली, अखेरची सलामी देताना पोलिसाकडून मिसफायर
अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारावेळी मोठी दुर्घटना टळली, अखेरची सलामी देताना पोलिसाकडून मिसफायर
img
वैष्णवी सांगळे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दोन दिवसांपूर्वी भीषण विमान अपघातात निधन झालं. काल त्यांच्यावर  बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लाडक्या दादाला निरोप देण्यासाठी महाराष्ट्रातून मोठा जनसागर उपस्थित होता. अजित पवारांच्या अपघाती निधनानं सर्वांनाच धक्का बसला. राजकारणातील उमदं व्यक्तीमत्व असलेल्या अजित पवारांची अकाली एक्झिट महाराष्ट्राला सुन्न करणार ठरली. दरम्यान अजित पवार यांना अखेरची सलामी देताना घडलेल्या एका अनपेक्षित घटनेने शोकाकुल वातावरणात क्षणभर खळबळ उडाली. शासकीय इतमामात सलामी देण्याची प्रक्रिया सुरू असताना एका पोलिस कर्मचाऱ्याकडून चुकून मिसफायर झाल्याचा प्रकार समोर आला आहे. 

अजित पवार यांना अंत्यसंस्काराच्यावेळी शासकीय मानवंदना देण्यात आली. अजित पवार यांना सलामी म्हणून तीन राऊंड हवेत फायर करण्यात आले. यावेळी एका पोलिस कर्मचाऱ्याकडून चुकून मिसफायर झालं. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झालाय.अजितदादांना पोलिसांकडून अखेरची सलामी देण्यात येत असताना ही घटना घडली. पोलिसांकडून सलामी देताना तीन राऊंड हवेत फायर केले जातात. यावेळी समोरच्या रांगेतील पोलिसाकडून पहिला राऊंड फायर केल्यानंतर दुसरा राऊंड फायर करताना पोलिसाच्या बंदुकीतून मिसफायर झालं. 

सुदैवाने बंदुकीतून सुटलेली ही गोळी कोणाला लागली नाही. अजित पवार यांच्या पार्थिवाला मुलांकडून मुखाग्नी दिली जात असताना हा प्रकार घडला. यावेळी तिथे अनेक मान्यवर उपस्थित होते. देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते, त्याशिवाय अन्य पक्षांचे नेते तिथे हजर होते. पण सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. 


इतर बातम्या
Join Whatsapp Group