ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी अजित पवारांच्या अपघाती मृत्यूबाबत गंभीर शंका उपस्थित केली आहे. हा अपघात नक्कीच संशयास्पद असल्याचे त्यांचे मत आहे. संजय राऊत यांनी अलीकडच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले आहे. राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांशी संबंधित एका महत्त्वाच्या फाईलचा मुद्दा उपस्थित केला. त्यांच्या माहितीनुसार, अजित पवार ज्या कारणास्तव भाजपमध्ये सामील झाले होते, ते कारणच या फाईलमुळे संपुष्टात आले नाही.
संजय राऊत यांनी म्हटले की, माझ्या माहितीनुसार, जरंडेश्वर साखर कारखान्याच्या कर्जाशी संबंधित फाईल केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांकडे बंद करण्यासाठी पाठवण्यात आली होती. त्यांच्या काही फाईल्स होत्या आणि त्याकरिता ते भाजपात गेले. ती फाईल पुन्हा उघडण्यात आली, अजित पवार यांच्या मृत्यू पूर्वी. खास करून जरंडेश्वर साखर कारखान्याच्या कर्जाचा विषय होता. ती फाईल इथून खास अमित शहा यांच्याकडे गेली, बंद करण्यासाठी.
पण अमित शहा यांनी ही फाईल बंद करू नये, असा निगेटीव्ह शेरा मारून पुन्हा महाराष्ट्रात पाठवली आणि त्यानंतर भाजपाचे मंत्री बोलायले लागले तुमची फाईल बंद झालेली नाही. त्यानंतर महाराष्ट्रातील मंत्री बोलायले लागले दादा तुमची फाईल आमच्याकडे आहे आणि तिथून ही सुरूवात झाली. ज्या कारणासाठी अजित पवार हे भाजपासोबत गेले, ते कारण संपलेच नाही.
पुढे संजय राऊत यांनी म्हटले की, मग दादांनी पुन्हा मागे फिरण्याबाबत पुर्वविचार सुरू केला. तिथूनच या रहस्यमय घडामोडींना सुरूवात झाली. अमित शहा यांनी ती फाईल बंद करण्यास नकार दिला. आपण त्या फाईलवरील शेरे देखील पाहू शकता. जरंडेश्वर साखर कारखान्याच्या कर्जामध्ये घोटाळा झाला होता म्हणून साखर कारखान्याची संपत्ती जप्त करण्यात आली होती. पण ती फाईल अचानक उघडण्यात आली. केंद्रीय सहकार मंत्र्यांनी ती फाईल बंद करू नये, अशाप्रकारचे शेरा मारून ती फाईल पाठवली होती.