शरद पवार आणि अजित पवार यांच्यासंदर्भात शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्या नात्यांसंदर्भात वक्तव्य करत राजकारणाबाबतही भूमिका मांडली आहे. अजित पवार यांना शरद पवार राजकीयदृष्ट्या कधीच माफ करणार नाही, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीगाठी होत असतात. कारण दोन्ही नेते अनेक संस्थांवर एकत्र काम करत आहेत. या संस्थांच्या कामांसाठी त्यांच्या भेटी होतात. तसंच, कौटुंबिक भेटीही त्यांच्या होत असतात.
अमित शाह यांनी अजित पवार यांना हाताशी धरुन राष्ट्रवादी पक्ष फोडला. त्याचा त्रास शरद पवार यांना झाला आहे. यामुळे राजकीयदृष्ट्या शरद पवार अजित पवार यांना कधीच माफ करणार नाहीत. कुटुंबाची नाती वेगळी असतात आणि राजकीय संबंध वेगळे असतात, असं राऊत यांनी म्हटलं आहे.