राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शरद पवार यांना खोकल्याचा आणि कफचा त्रास जाणवू लागल्यामुळे शरद पवार यांना उपचारांसाठी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं होतं. गेले पाच ते सहा दिवस शरद पवारांवरती उपचार करण्यात आले, त्यांची प्रकृती चांगली झाल्याने आज त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे.
डॉक्टर काय सांगितलं?
शरद पवारांना आज (ता. १४) रुग्णालयातून डिस्चार्ज मिळतआहे. पवारांची तब्येत आता उत्तम आहे, अशी माहिती रुबी हॉल क्लिनिकमधील डॉक्टरांनी दिली आहे. तसेच शरद पवारांना पुरेशी विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तीन चार दिवस विश्रांती घेतल्यानंतर पवार प्रवास करून शकतात, असंही डॉक्टरांनी सांगितले.
शरद पवार यांच्या छातीत संसर्ग झाला होता. त्या संसर्गावर अँटीबायोटिक्स)देण्यात आली असून त्याचा चांगला परिणाम झाला आहे. सध्या त्यांच्या प्रकृतीत समाधानकारक सुधारणा झाली आहे. डॉक्टरांच्या मते, ते दोन ते तीन दिवसांनंतर प्रवास करू शकतील.