शरद पवारांना अजितदादांचा मोठा धक्का :  निष्ठावंत कार्यकर्ता 'घड्याळ' हाती घेणार
शरद पवारांना अजितदादांचा मोठा धक्का : निष्ठावंत कार्यकर्ता 'घड्याळ' हाती घेणार
img
Dipali Ghadwaje
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांना हिंगोलीमध्ये मोठा हादरा बसला आहे. निष्ठावंत शिलेदार म्हणून ओळख असलेले अनिल पतंगे  यांनी शरद पवार यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अनिल पतंगे यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.  त्यामुळे आता हिंगोलीच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होताना पाहायला मिळत आहे. 

अनिल पतंगे यांचे हिंगोली जिल्ह्यात वजन आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर निष्ठावंत नेत्याने साथ सोडल्यामुळे हिंगोलीमध्ये शरद पवार यांच्या तुतारीची वाट बिकट झाल्याचे म्हटले जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, अनिल पतंगे ८ जून रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. त्यासाठी अजित पवार ८ जून रोजी हिंगोलीच्या दौऱ्यावर येत आहे. अनिल पतंगे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते त्यांच्यासोबत घड्याळ हातात बांधणार आहेत. सेनगाव येथे ८ जून रोजी पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 

यावेळी अनिल पतंगे यांच्यासह सेनगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांसह अनेक नगरसेवक आणि ग्रामीण भागातील पदाधिकारी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. हा शरद पवार यांना सर्वात मोठा हादरा मानला जातोय. 

रविवारी होणाऱ्या पक्ष प्रवेश सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत पालकमंत्री नरहरी झिरवळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काही स्थानिक नेते उपस्थित राहणार आहे. 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group