उत्तरप्रदेश: राजकरणातून एक दुःखद बातमी समोर येत आहे. हापूरच्या पिलखुवा येथील भाजपच्या ज्येष्ठ नेत्या लज्जा गर्ग यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच भाजपमध्ये शोककळा पसरली. मोठ्या संख्येने नागरिक रुग्णालय तसेच गांधी रोडवरील त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. यावेळी त्यांच्या पार्थिवावर पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
भाजपमध्ये अनेक महत्वाच्या पदांवर जबाबदारी लज्जा राणी गर्ग या अनेकवर्ष भाजप संघटनेत सक्रिय होत्या, त्यांनी महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय सचिव, प्रदेश उपाध्यक्ष आणि क्षेत्रीय अध्यक्ष यांसह पक्षातील अनेक महत्वाच्या पदांची जबाबदारी सांभाळली होती. तसेच त्या भाजपच्या राष्ट्रीय परिषद आणि प्रदेश कार्यसमितीच्या सदस्यही राहिल्या होत्या. संघटनेत दीर्घकाळ सक्रिय राहिल्याने कार्यकर्त्यांमध्ये त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली होती. संघटनात्मक जबाबदाऱ्यांसोबतच त्या स्थानिक पातळीवरही सक्रिय होत्या.