आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे जसे जोरदार वाहत आहेत तसेच पक्षांतराचेही वारे जोरदार वाहत आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून पक्षांतर करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. अनेक नेते, पदाधिकारी मोठ्या संख्येने सत्ताधारी पक्षात प्रवेश करत आहेत. अशामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.
हे ही वाचा !
शरद पवार गटाचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी आज काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला. मुंबईतील टिळक भवन या काँग्रेसच्या कार्यालयामध्ये पक्ष प्रवेशाच कार्यक्रम पार पडला. मुंबईमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या या पक्ष प्रवेशामुळे परभणीमध्ये शरद पवार गटाची ताकद कमी होत काँग्रेसची ताकद वाढली आहे.