आज राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा हो आहे ती सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्या भेटीची. रणरणत्या उन्हात लेकीने वडिलांच्या भेटीसाठी ताफा थांबविल्याची चर्चा सध्या सुरु आहे.
सुप्रिया सुळे आणि शरद पवारांच्या गाडीचा ताफा समोरासमोर आल्यानंतर सुप्रिया यांनी आपली गाडी रस्त्याच्या बाजुला उभी करत आई-वडिलांकडे धाव घेतली.बाप-लेकीच्या या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियातून समोर आला आहे. लोकसभा मतदार संघातील आपला इंदापूर दौरा आटोपून पुरंदरकडे निघालेल्या खासदार सुप्रिया सुळे यांची आज मोरगावजवळ अचानक वडिल आणि आईसोबत भेट झाली.
बारामतीकडे निघालेल्या शरद पवार आणि आई प्रतिभा काकी यांची कार भररस्त्यात दिसल्यानंतर सुप्रिया सुळेंनी आपली गाडी थांबवत वडिलांची भेट घेतली.
आई-वडिलांची कार पाहताच खासदार सुळे गाडीतून उतरत शरद पवारांजवळ गेल्या, आई वडिलांची विचारपूस केली, तसेच त्यांच्या दौऱ्याचा आढावा घेतला.दरम्यान , दोन्ही ताफ्यातील सुरक्षा रक्षक रस्त्यावर उतरुन इतर वाहनांना पुढे जाण्याचं आवाहन करत होते. तसेच कुणालाही रस्त्यावर थांबू दिले जात नव्हते