महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मृत्यूच्या बातमीने संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना भावना अनावर झाल्या आहेत. अनेक नेत्यांच्या तोंडून शब्दही फुटेनासे झाले आहेत. अनेकांना अश्रू अनावर झाले आहेत. बारामतीमधील वातावरण सध्या शोकाकूल झाले आहे.
दरम्यान अजित दादांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची वार्ता कळताच खासदार सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का बसला आहे. सकाळी त्यांचा व्हॉट्सॲप स्टेट्सवर Devasted ‘उद्धवस्त’ असे लिहिलेले होते. एकाच शब्दात आपलं किती नुकसान झालं, पवार कुटुंबियांचं, राष्ट्रवादी पक्षाचं किती नुकसान झालं याचा संदेशच त्यांनी दिला.
सुप्रिया सुळे आणि अजितदादांच्या पत्नी या दिल्लीत होत्या. ही वार्ता कळताच त्या सकाळीच बारामतीसाठी निघाल्या. दरम्यान सुप्रिया सुळे यांना लाडका दादा गेल्याने शोक अनावर झाला. त्यांच्या व्हॉट्सॲप स्टेट्सवर उद्धवस्त असे लिहिलेले होते. एकाच शब्दात त्यांनी त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली.