मोठी बातमी : धनंजय मुंडे राजीनामा देणार? दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग ; नेमकं काय घडतंय?
मोठी बातमी : धनंजय मुंडे राजीनामा देणार? दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग ; नेमकं काय घडतंय?
img
DB
अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर दबाव वाढला असून, त्यांनी हा चेंडू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात टाकला आहे. मात्र या प्रकरणात तीन प्रकारच्या चौकशा सुरू आहेत.

त्यामुळे त्यात कुणी दोषी असेल तर त्याला पाठीशी घातले जाणार नाही, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तुर्तास अभय दिले. जी माझी भूमिका आहे, तशीच भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान , मकोका लागलेल्या वाल्मिक कराड प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाब वाढतच चालला आहे. या पार्श्वभूमीवरच धनंजय मुंडे दिल्लीत आहेत. केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्र्यांची भेट घेण्यासाठी धनंजय मुंडे दिल्ली दौरा करत आहे. आज (29 जानेवारी) धनंजय मुंडे आणि केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री यांच्यात दुपारी 12 वाजताच्या दरम्यान भेट होणार आहे.

विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही आजपासून (29 जानेवारी) तीन दिवस दिल्लीत असणार आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी फडणवीस जातायत. पण  वाल्मिक कराडवरून महाराष्ट्रातला राजकीय तणाव पाहता या दौऱ्यांचा राजकीय अर्थ काढला जात आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोमवारी अजित पवारांची भेट घेऊन धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी मुंबईत मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोघांची भेट घेतली. त्यामुळे आता दिल्लीत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर काही निर्णय होणार का, याची चर्चा सुरू आहे.
 
  
इतर बातम्या
Join Whatsapp Group