एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याबाबत भविष्यवाणी केलीय. देवेंद्र फडणवीस म्हणाले की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत. त्याला काहीच अर्थ उरलेला नाहीय.
जर 2009 मध्ये शिवसेना आणि मनसे एकत्र आले असते तर आजची राजकीय परिस्थिती वेगळी पाहायला मिळली असती. त्या काळातच त्यांना मत मिळाली असती. आता त्यांच्याकडे मतचं राहिलेली नाहीय. जिथपर्यंत राज ठाकरेंचा प्रश्न आहे, मी अत्यंत स्पष्ट शब्दात सांगतो, या निवडणुकीनंतर राज ठाकरेंचा सर्वात मोठा पराभव होणार आहे.
या युतीत राज ठाकरेंना काहीही फायदा होणार नाही. राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना फायदा होईल, मात्र उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना फायदा होणार नाही. राज ठाकरे हे फक्त पराभूत होणार नाहीत, तर इतिहासात सर्वात मोठ्या पराभवाचे धनी म्हणून ओळखले जातील, ही मी भविष्यवाणी करतो, तुम्ही निकालानंतर पाहा, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.तसेच जन्मामुळे मालमत्ता मिळू शकते. पण विचारांचा वारसा मिळत नाही. यांना विचारांचा वारसा मिळालेला नाहीय, अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.