स्व. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग टाकणाऱ्या आरोपीला अटक
स्व. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग टाकणाऱ्या आरोपीला अटक
img
दैनिक भ्रमर
दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी स्व. मीनाताई ठाकरे यांच्या दादरच्या शिवाजी पार्क येथील पुतळ्यावर लाल रंग टाकल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

उपेंद्र गुणाजी पावसकर असे आरोपीचे नाव असून त्याने हा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. 

विशेष म्हणजे आरोपी हा ठाकरेंच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ असल्याची माहिती प्राथमिक तपासातून पुढे आली आहे. 
पोलिसांनी अटक केल्यानंतर आरोपीने जबाबात धक्कादायक माहिती दिली आहे.

संपत्तीच्या वादात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हस्तक्षेप करत असल्याचा आरोप आरोपीने केला आहे. दादर पोलीस ठाण्यात श्रीधर पावसकर आणि आदित्य ठाकरे यांच्याविरोधात तो तक्रार देण्यासाठी सातत्याने यायचा असे समजते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group