मराठी माणसासाठी राजकारण करणारे ठाकरे गट शिवसेना आणि मनसेची युती होणार असल्याची चर्चा आहे. त्याआधी राज आणि उद्धव ठाकरे विजयी मेळाव्यात एकत्र येणार आहेत. जवळपास १९ वर्षांनी दोन्ही ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर सर्व शक्तीनिशी एकत्र येत आहेत.
दरम्यान ही सुरुवात आहे. असं म्हणत ठाकरे बंधूनी पाच जुलैच्या मेळाव्यासाठी दुसरं जाहीर निमंत्रण मराठी बांधवांना दिलय. त्याआधी राज ठाकरेंनी महाराष्ट्र् नविनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना महत्त्वाचा आदेश दिलाय.
हिंदीसक्तीच्या विरोधात महाराष्ट्रातील सर्वच क्षेत्रातून उमटलेले पडसाद उमटले. ही बाब लक्षात अगामी महापालिका निवडणुकीत जनमत आपल्या विरोधात जाईल, यामुळे सरकारमधील पक्षांनी शासन अध्यादेश रद्द केला.
त्यानंतर शासनविरोधातील मोर्चा रद्द करून मराठी माणसांच्या जल्लोष मेळाव्याचे आयोजन मनसे आणि शिवसेनेने केलंय.
येत्या ५ तारखेला सकाळी १० वाजता वरळीतील एनएससीआय डोममध्ये भव्य मेळावा होणार आहे. दोन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांवर विशेष जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. सभेची तयारी अंतिम टप्प्यात आल्याचं दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी सांगितलंय. त्याआधी राज ठाकरे यांनी मनसैनिकांना महत्त्वाचा आदेश दिलाय. सभेला कोणत्याही पक्षाचे लेबल लागू नये, अशा सुचना देण्यात आल्या आहेत.
राज ठाकरेंकडून प्रत्येक मनसैनिकांना आदेश
राज ठाकरे यांच्या आदेशानुसार ५ जुलै २०२५ रोजी होणाऱ्या विजयी मेळाव्याला आपण पक्षाचा झेंडा, स्कार्फ, बिल्ला, पक्षचिन्ह असलेले प्लाकार्ड तसेच फलक, बॅनर किंवा होर्डिंग, किंवा झेंडा लावू नये. प्रभागात लावण्यात आलेल्या फलकांवरही पक्षाचे नाव आणि चिन्ह वापरू नये. दिलेल्या सूचनांचे आपण पालन करावं. या मेळाव्याला कोणताही झेंडा नको फक्त मराठीचा अजेंडा असू द्या असे आदेश राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिला आहेत.