राजकारणातील ऐतिहासिक क्षण ! जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला, ठाकरे बंधूंची युती कुठे होणार ?
राजकारणातील ऐतिहासिक क्षण ! जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला, ठाकरे बंधूंची युती कुठे होणार ?
img
वैष्णवी सांगळे
अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेचा अखेर मुहूर्त ठरलाय. आज दुपारी 12 वाजता मुंबईतील ब्ल्यू सी हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेत ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार आहे. 

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील जागावाटप यशस्वीरित्या पूर्ण झाले असून, यामध्ये कोणतीही रस्सीखेच नसल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. या युती अंतर्गत मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या सात महानगरपालिकांसाठी दोन्ही पक्ष एकत्र लढणार आहेत. कार्यकर्त्यांनी ही युती स्वीकारली असून, कोणताही विसंवाद नसल्याचे राऊत यांनी नमूद केले. 

जुलै महिन्यातील मराठी विजय मेळावा आणि त्यानंतर वाढलेल्या भेटीगाठींमुळे ठाकरे बंधू एकत्र येणार हे जवळपास निश्चित झालं होतं. मात्र, ठाकरे बंधू युतीची अधिकृत घोषणा कधी करणार ? याची प्रतीक्षा दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये होती. अखेर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी युतीचा मुहूर्त जाहीर केला. दोन्ही बंधूंमध्ये जागावाटपाची चर्चा जरी झाली असली तरी त्याची घोषणा कधी केली जाणार याकडेही सर्वांचे लक्ष आहे. 

मनसे अन् शिवसेना हे दोन्ही पक्ष मुंबईसह सहा महापालिकांमध्ये एकत्रित लढणार आहेत. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, मीरा भाईंदर आणि पुणे या महापालिकांच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र लढणार आहेत, असं संजय राऊत यांनी सांगितलं. आता उर्वरित महापालिकांमध्येही दोन्ही पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group