मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकला, ठाकरेंची सेना आक्रमक
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकला, ठाकरेंची सेना आक्रमक
img
वैष्णवी सांगळे
मुंबईमधील दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानाजवळ असलेल्या मीनाताई ठाकरे (शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी) यांच्या पुतळ्यावर काही समाजकंटकांनी रंग फेकल्याचा दावा शिवसेनेने (ठाकरे गट ) केला आहे. या घटनेनंतर शिवाजी पार्क परिसरात शिवसैनिकांनी गर्दी केली होती. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. 

आज सकाळी घडलेल्या या प्रकारामुळे शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून पुतळ्यावर आणि आजूबाजूच्या परिसरात लाल रंग पडलेला आढळून आला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

राज्य सरकारची घोषणा, नोव्हेंबरपासून महिलांच्या खात्यात ₹२१०० येणार

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मीनाताईंच्या पुतळ्यावर आणि पुतळ्याच्या पायथ्याशी लाल रंग पडलेला आढळले. यानंतर ठाकरे गटाचे अनेक शिवसैनिक तातडीने शिवाजी पार्क येथे जमा झाले. संतप्त कार्यकर्त्यांनी तात्काळ पुतळ्याची साफसफाई सुरू केली. त्यांनी पुतळ्यावरील रंग काढण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. 

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पुतळ्याच्या परिसरात धाव घेतली. सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे राजकीय वर्तुळातही जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सध्या शिवाजी पार्क परिसरात पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group