महाराष्ट्र हादरला ! रात्रीच्या वेळी बसने १३ जणांना चिरडलं , कुठे घडली घटना ?
महाराष्ट्र हादरला ! रात्रीच्या वेळी बसने १३ जणांना चिरडलं , कुठे घडली घटना ?
img
वैष्णवी सांगळे
मुंबईतून मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. भांडूप रेल्वे स्थानकाजवळील बस डेपो जवळ बेस्ट बसने १३ प्रवाशांना चिरडलं आहे.  या दुर्दैवी घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला आहे. बेस्ट बस रिव्हर्स घेत असताना झालेल्या या अपघातात ३ महिला आणि १ पुरुष अशा ४ जणांचा मृत्यू झाला आहे. लोक कामावरून घरी जात असताना गर्दीच्या वेळी हा अपघात झाला. भांडूप स्टेशन वेस्टला झालेल्या या अपघातामुळे मुंबई हादरली आहे. या घटनेत १० जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री १० च्या सुमारास ही घटना घडली आहे. लोक कामावरून घरी जात असताना या ठिकाणी मोठी गर्दी होती, या गर्दीच्या वेळी चालक बस रिवर्स घेताना बस प्रवाशांना धडकली. त्यामुळे अनेक प्रवाशी बसखाली चिरडले गेले. यामुळे घटनास्थळी आरडाओरडा आणि पळापळ सुरू झाली. उपस्थित लोकांनी जखमींना बसखालून बाहेर काढले आणि तातडीने उपचारासाठी जवळच्या दवाखान्यात दाखल केले.

या घटनेनंतर मुंबई अग्निशमन दल, पोलिस, बेस्ट कर्मचारी आणि 108 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पोलिसांनी या घटनेचा अधिक तपास सुरु केला आहे.  या घटनेच्या वेळी बस चालवत असलेल्या ड्रायव्हरला ताब्यात घेण्यात आला असून त्याची चौकशी सुरू आहे अशी माहिती समोर आली आहे. 


इतर बातम्या
Join Whatsapp Group