भीषण अपघात ! भरधाव कंटेनरने सहा जणांना चिरडलं; चौघांचा जागीच मृत्यू
भीषण अपघात ! भरधाव कंटेनरने सहा जणांना चिरडलं; चौघांचा जागीच मृत्यू
img
वैष्णवी सांगळे
आज सकाळी आठच्या सुमारास धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीडजवळील नामलगाव फाटा येथील उड्डाणपुलाजवळ झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झालाय. या घटनेमुळे परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत दोघे गंभीर जखमी झाले आहे. 

धक्कदायक ! नवऱ्याने बायकोला संपवलं; धारदार शस्त्राने १२ वेळा वार

मिळालेल्या माहितीनुसार भरधाव वेगात असणाऱ्या कंटेनरने पेंडगाव येथे देवदर्शनासाठी निघालेल्या सहा पादचाऱ्यांना चिरडले. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, कंटेनरचा चालक ताब्यात घेण्यात आला आहे. 

आशिया कपआधी टीम इंडियात मोठी उलथापालथ, रॉजर बिन्नी यांचा BCCI अध्यक्षपदाचा राजीनामा

काही दिवसांपूर्वीच गढी उड्डाणपुलाजवळ अशाच पद्धतीने एका कंटेनरच्या धडकेत पाच ते सहा जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांच्या भरधाव वेगावर आळा घालण्याची गरज नागरिक व्यक्त करत आहेत. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group