अपघाताचे सत्र सुरूच !  ट्रकची कंटेनरला जोरदार धडक , दोघांचा मृत्यू
अपघाताचे सत्र सुरूच ! ट्रकची कंटेनरला जोरदार धडक , दोघांचा मृत्यू
img
Dipali Ghadwaje
राज्यात अपघात थांबायचे नाव घेत नाहीये आत्ताच शिरपूर तालुक्यातील पळासनेर येथील चारणपाडागावा जवळ मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील गतिरोधकवर ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले व पुढे चालत असलेल्या कंटेनरला पाठीमागून या ट्रकने जबर धडक दिली. या धडकेनंतर कंटेनर रस्त्यावर उलटल्याने मोठा अपघात झाला. या अपघातामध्ये ट्रकमधील दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 

मिळलेल्या माहितीनुसार , मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून मध्य प्रदेशाकडून महाराष्ट्रात येणाऱ्या लेनवर पळासनेर येथील चारणपाडा जवळ गतिरोधकवर ब्रेक फेल झाल्याने भरधाव वेगात असलेली प्लायवूड भरलेल्या ट्रकने पुढे चालणाऱ्या कंटेनरला जोरदार धडक दिली.

धडक इतकी जोरदार होती की काही अंतरापर्यंत रस्त्यावर कंटेनरला ट्रकने घसरून नेले आणि त्यामुळे कंटेनर रस्त्यावर पलटी झाला. दरम्यान , ट्रकमधील चालक व सह चालक दोघेही कॅबिनमध्ये दाबले गेल्याने दोघांचा यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी व पोलिसांनी धाव घेत मदत कार्य सुरू केले. तसेच क्रेनच्या साहाय्याने उलटलेला कंटेनर रस्त्यावरून बाजूला करीत वाहतूक मोकळी केली. 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group