कार आणि ट्रकचा भीषण अपघात ; धडकेनंतर दोन्ही वाहनांना आग, आत बसलेले......
कार आणि ट्रकचा भीषण अपघात ; धडकेनंतर दोन्ही वाहनांना आग, आत बसलेले......
img
Dipali Ghadwaje
अकोला : अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालूक्यातल्या तिवसा गावात ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातानंतर दोन्ही वाहनांना भीषण आग लागली. आगीत दोन्ही ट्रक व कार जळून खाक झाले आहेत. दरम्यान सुदैवाने अपघातात कोणतीही जिवितहानी झाली नाही. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातल्या दिवसा गावात नजीक महान- बार्शीटाकळी रस्त्यावर मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. ट्रक पंक्चर झाल्यामुळे रस्त्यावर उभा होता. या उभ्या ट्रकला कारने मागून जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता, कि यामुळे दोन्ही वाहनात स्पार्किंग होऊन गाड्यांना आग लागली. यात कार व ट्रक संपूर्ण जळून खाक झाले असून अपघातात दोन्ही वाहनाचं मोठं नुकसान झाले. 
 
उभ्या ट्रकला धडक दिल्यानंतर कारमधील वाहन चालक आणि इतरांनी तातडीने सतर्क बाळगत कारमधून खाली उतरले. सुदैवाने धडक बसल्यानंतर कारचे दरवाजे लॉक न झाल्याने सर्वांना बाहेर निघता आहे. सर्व प्रवाशी बाहेर निघताच कारने पेट घेतला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

इतर बातम्या
Join Whatsapp Group