महापालिका निकालानंतर राडा ! भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकाला मारहाण
महापालिका निकालानंतर राडा ! भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकाला मारहाण
img
वैष्णवी सांगळे
राज्यातील २९ महानगरपालिकांचे निकाल काल हाती आले आणि दिग्गज्जांना धक्का बसला. या निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. दरम्यान अकोल्यातील अकोटफैल भागात निवडणुक निकालानंतर भाजपच्या दोन गटांत मोठा राडा झाला. प्रभाग क्रमांक 2 मधील भाजपचे विजयी उमेदवार शरद तुरकर यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. हल्ल्यात शरद तुरकर गंभीर जखमी झाले असून तुरकरांवर  रूग्णालयात उपचार सुरू आहेत. 

'काय चुकलं, काय राहून गेलं...'; मुंबई महापालिकेच्या निकालानंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

माहितीनुसार, अकोल्यात महापालिका निकालानंतर भाजपच्या दोन गटांत जोरदार राडा झाला. निवडणुकीत आपलं काम केलं नाही म्हणून भाजपचे प्रभाग क्रमांक 2 (ब) चे विजयी उमेदवार शरद तुरकर यांच्यावर दगड आणि चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. याच प्रभागातील (ड) गटातील भाजपचे पराभूत उमेदवार नितीन राऊत आणि त्यांच्या समर्थकांनी हा हल्ला केला. समर्थकांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

अकोटफैल पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावरच हा हल्ला झाला. यात अनेक वाहनांची तोडफोड तसेच मोठ्या प्रमाणात दगडफेक देखील करण्यात आली. या प्रभागात शरद तुरकर हे भाजपचे एकमेव विजयी उमेदवार आहेत. प्रभागातील इतर ३ जागांवर एमआयएमचे उमेदवार विजयी झाले आहेत. दरम्यान, घटनेतील आरोपी नितीन राऊतला अद्याप ताब्यात घेण्यात आलेले नाही.


इतर बातम्या
Join Whatsapp Group