मोठी बातमी : आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील गाडीचा भीषण अपघात;
मोठी बातमी : आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील गाडीचा भीषण अपघात; "इतक्या" जणांचा मृत्यू
img
Dipali Ghadwaje
अकोल्यामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. अकोल्यामध्ये भीषण रस्ते अपघातामध्ये  ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या भावाच्या कारला भीषण अपघात झालाय. या अपघातामध्ये  जणांचा जागीच मृत्यू झालाय. 

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्यातल्या पातूर शहराजवळ हा अपघात झालाय. या अपघातामध्ये अनेक जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केलाय.

दरम्यान या अपघातात कारमधून किरण सरनाईक यांचा भाऊ, भावाचा मुलगा, मुलगी आणि नात प्रवास करत होते. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही कारचा चक्काचूर झाला आहे. या अपघातामध्ये  ७ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर अपघातामध्ये काही जण जखमी झाले आहेत. जखमींना अकोल्याच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

या अपघातामध्ये  ७ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये एक आणि तीन वर्षांच्या चिमुकल्यांचा देखील समावेश आहे.

या अपघातामध्ये स्मिरा अजिंक्य आमले ( १ वर्ष - नागपूर), रघुवीर अरुण सरनाईक (२८ वर्षे- वाशिम), शिवाणी अजिंक्य आमले (३० वर्षे - नागपूर), पियुष भगवान देशमुख (१० वर्षे - वाशिम), सपना भगवान देशमुख (३५ वर्षे - वाशिम), सिद्धार्थ यशवंत इंगळे (३१ वर्षे पातूर), श्रेयश इंगळे (३ वर्षे पातूर) यांचा मृत्यू झाला आहे. अपघातातील मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले आहेत. 

दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पातूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून ते तपास करत आहेत.  या अपघातामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. 

 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group