अकोल्यातील नगरसेवकपदाच्या उमेदवाराच्या नवऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. जिल्ह्यातील अकोट नगरपालिकेच्या प्रभाग १५ च्या नगरसेवकपदाच्या एमआयएमच्या महिला उमेदवार उज्वला तेलगोटे यांच्या नवऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला.
मॉर्निंग वॉकला गेले असता आज सकाळच्या सुमारास त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. या हल्ल्यात राजेश तेलगोटे गंभीर जखमी झाले आहेत. मॉर्निंग वापरून घरी परत येत असताना तीन जणांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात राजेश तेलगोटे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर अकोटच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हल्ल्याची माहिती समजतात तेलगोटे यांचे समर्थक आणि कार्यकर्त्यांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली. दरम्यान याप्रकरणी अकोट शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र या घटनेमुळे अकोल्यात मोठी खळबळ उडाली आहे. राजकीय वादातून तेलगोटे यांच्यावर हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली.