'रात्री भेट, पगाराचं काम करून देतो'; तहसील कार्यालयातील प्रकाराने खळबळ
'रात्री भेट, पगाराचं काम करून देतो'; तहसील कार्यालयातील प्रकाराने खळबळ
img
वैष्णवी सांगळे
महिलांवर कामाच्या ठिकाणी होणारे अत्याचार ही गंभीर बाब बनत चालली आहे. फक्त खाजगीच नाही तर सरकारी कार्यालयात देखील महिलांवर होणारे विनयभंगाचे प्रकार संतापजनक रित्या वाढतच आहे.  दरम्यान अकोल्यातील तहसील कार्यालयात घडलेल्या एका घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. 
शहरातील एका विधवा महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, महसूल सहाय्यकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


BMC कडून दिवाळीची 'बंपर' भेट; महापालिका कर्मचाऱ्यांना तब्बल 'इतक्या' रुपयांचा बोनस

मिळालेल्या माहितीनुसार, अकोला शहरातील सिटी कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत तहसील कार्यालयात एका विधवा महिलेला पगार लावून देतो असे म्हणत तिने दिलेल्या तक्रारीनुसार, शुक्रवारी दुपारी पीडित महिला तहसील कार्यालयात गेल्यानंतर महसूल सहाय्यक खुळे यांनी तिचा हात पकडला आणि रात्री भेटल्यास पगाराचे काम करून देतो, असे म्हणत तिच्यासोबत गैरवर्तन केले. याचवेळी कार्यालयीन कामकाज संपल्यानंतर देखील "तू मला भेट" असे सांगून विनयभंग केल्याचा गंभीर आरोप महिलेने पोलिसांकडे केला आहे.

नाशिकच्या 'तेजस'ची पाकिस्तानलाही धडकी, कारण...

महिलेच्या लिखित तक्रारीनंतर सिटी कोतवाली पोलिसांनीमहसूल सहाय्यकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांमध्येही तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेनंतर तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांची पुढील भूमिका काय राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून सुरु आहे. 


akola |
इतर बातम्या
Join Whatsapp Group