अकोला महापालिकेत पुन्हा एकदा कमळ फुललं आहे. अकोल्यात पुन्हा एकदा भाजपने सत्ता राखली आहे.अकोला महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या शारदा खेडकर तर उपमहापौरपदी अमोल गोगे यांची निवड करण्यात आली आहे. भाजपच्या शारदा खेडकर यांनी ४५ मतं मिळवून शिवसेना (ठाकरेंचा गट)च्या उमेदवार सुरेखा काळे यांना १३ मतांनी पराभूत करून महापौरपदावर विराजमान झाल्या आहेत.
विशेष म्हणजे, सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस आणि वंचित आघाडीने पूर्ण ताकदपणाला लावली होती. पण, सभागृहात आज एमआयएमने तटस्थ राहिल्यामुळे गेम फिरला. एमआयएमच्या तीन सदस्यांनी तटस्थ भूमिका घेतल्याने ही निवडणूक 77 पैकी 45 विरुद्ध 32 असा सामना भाजपने जिंकला.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने भाजपला पाठिंबा दिला आणि एमआयएम तटस्थ असल्याने, काँग्रेस नगरसेवक सभागृहात संतप्त झाले होते.सभागृहात विरोधी पक्षाने संतप्त होतं एमआयएमच्या नगरसेवकांवर बांगड्याही फेकल्याचा आरोप केला जात आहे. एमआयएमच्या तटस्थ भूमिकेमुळे आघाडीचे गणित बिघडल्यामुळे सभागृहात काहीकाळ तणाव झाला होता.