मोठी बातमी: निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानपरिषदेची निवडणूक जाहीर  , निवडणूक कधी ?
मोठी बातमी: निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानपरिषदेची निवडणूक जाहीर , निवडणूक कधी ?
img
वैष्णवी सांगळे
महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या रिक्त होणाऱ्या 9 जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आहे. विधानपरिषदेच्या या 9 जागांसाठी 23 एप्रिलपासून अर्ज दाखल करता येणार असून 12 मे रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या दिवशीच सायंकाळी 5 वाजता मतमोजणी होणार आहे. उद्धव ठाकरे, शशिकांत शिंदे यांच्यासह 9 आमदारांचा कार्यकाळ 13 मे रोजी संपुष्टात येणार असल्याने रिक्त होणाऱ्या जागांसाठी ही निवडणूक होत आहे.



केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, 23 एप्रिल 2026 पासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून 30 एप्रिल 2026 ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असणार आहे. 2 मे 2026 रोजी अर्जांची छानणी करण्यात येणार आहे, तर 4 मे 2026 हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी 12 मे 2026 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान होणार असून त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता मतमोजणीला प्रारंभ होईल.

दरम्यान, विधानसभेत असणाऱ्या संख्याबळानुसार विधानपरिषद निवडणुकीत 9 जागांपैकी 5 जागा भाजपच्या वाट्याला, 2 जागा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला, 1 जागा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादीला आणि महाविकास आघाडीतील तीन पक्षांत मिळून एक जागा मिळण्याची शक्यता आहे.

कोणकोणत्या आमदारांचा कार्यकाळ संपुष्टात?
1. उद्धव ठाकरे
2. नीलम गोऱ्हे
3. शशिकांत शिंदे
4. अमोल मिटकरी
5. गोपीचंद पडळकर
6. रणजितसिंह मोहिते-पाटील
7. राजेश राठोड
8. प्रवीण दटके
9. रमेश कराड
इतर बातम्या
Join Whatsapp Group