राज्यात विधान परिषदे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठी उलथापालथ होर असून आता उद्धव ठाकरे गटाला मोठा दणका मिळाला आहे. नुकतीच बाळ माने यांनी एका मतदारसंघातून माघार घेतली आणि आता ठाकरेंच्या सेनेतील धनंजय डिकोळेंनीही माघार घेतल्याचं चित्र आहे. धनंजय डिकोळे यांनी माघार घेतल्याने ठकरे गटाला मोठा फटका मानला जात आहे. अर्ज मागे घेण्यासाठी 15 मिनिटे शिल्लक असतानाच मोठया घडामोडी घडल्या.
एकूणच महायुतीला आता विधान परिषदेच्या पाच जागा बिनविरोध करण्यात मोठं यश आलं आहे. ठाणे, कोकण, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, यवतमाळ अशा जागा बिनविरोध झाल्या आहेत.