...अन्यथा पाप लागेल’ ! मतपेटीत आढळल्या २ चिठ्ठ्या; मजकूर वाचून  चर्चाना उधाण
...अन्यथा पाप लागेल’ ! मतपेटीत आढळल्या २ चिठ्ठ्या; मजकूर वाचून चर्चाना उधाण
img
Nandini khandare More
राज्याच्या विधान परिषदेच्या २०२६ मधील पाच शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर  राजकारणातील घडामोडींना वेग आला असून आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं असून पुण्यात मतपेटीत २ चिठ्ठ्या आढळल्या असल्याचं समोर आलं आहे. 

अशातच पुणे शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी प्रक्रियेदरम्यान दोन चिठ्ठ्या आढळल्याने चर्चेला उधाण आलं आहे. पहिल्या चिठ्ठीमध्ये ‘आम्हाला कोणी विकत घेऊ शकत नाही. २००४ पूर्वीची जुनी पेन्शन लागू करा, नाहीतर बघा!’ असा मजकूर लिहिलेला असल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसऱ्या चिठ्ठीमध्ये ‘पदवीधरांचे काम करा, अन्यथा पाप लागेल’ असा संदेश लिहिलेला होता. मतमोजणीदरम्यान या दोन्ही चिठ्ठ्या आढळल्याने शिक्षक आणि पदवीधरांच्या प्रश्नांबाबत व्यक्त करण्यात आलेल्या या संदेशांची चर्चा सुरू झाली आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group