पुण्यासह पिंपरी चिंचवड परिसरात मृत्यूचा हाहाकार उडाला आहे. पुण्यातील विषारी दारू प्रकरणामुळे फक्त शहरच नव्हे तर अख्खा महाराष्टर हादरला आहे.
प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार, पिंपरी-चिंचवड परिसरात 10, तर हडपसर आणि काळेपळ परिसरात 5 जणांचा बळी गेला. तर इतर अनेक जण अजूनही रुग्णालयात दाखल असून, त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
या भयंकर घटनेनंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून, बेकायदा दारू विक्रीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात पुणे व पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील ९ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांनी आपल्या विभागातील तब्बल १३ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, सीआयडीकडे आता तपास सोपवण्यात आला आहे. पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संयुक्त कारवाईत आतापर्यंत अनेक संशयितांना अटक करण्यात आली आहे. अवैधपणे उत्पादित केलेल्या या दारूमध्ये मिथेनॉल मिसळण्यात आल होतं, ज्यामुळे अनेकांचाजीव गेला, असं प्राथमिक तपासात उघड झालं. तपास यंत्रणांकडून आता पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पसरलेल्या अवैध दारूच्या नेटवर्कचा सखोल तपास केला जात आहे.लाय.