देशासह सध्या देशातील घडामोडींना वेग आला असून आता एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबई तसेच देशातील इतर महत्त्वाच्या शहरांवर दहशतवादी हल्ला करण्याचा कट असल्याची अपडेट समोर आली असून या प्रकरणी पोलिसांनी नऊ जणांना अटक केली असल्याची माहिती आहे.
राजधानी दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. दिल्लीमध्ये पोलिसांनी एकूण नऊ जणांना अटक केली आहे. या नऊ जाणांचा दिल्ली, मुंबई तसेच देशातील इतर महत्त्वाच्या शहरांवर दहशतवादी हल्ला करण्याचा कट होता, अशी माहिती समोर आल आहे. पोलिसांनी या प्रकरणी एकूण नऊ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या हिटलिस्टवर मुंबई शहरदेखील होते.
दिल्ली पोलिसांनी एकूण नऊ जणांना अटक केली आहे. त्यांचा दिल्ली, मुंबईत दहशतवादी हल्ला करण्याचा कट होता, अशी माहिती समोर येत आहे. त्यांनी मुंबईतील दादर तसेच इतर परिसराची रेकी केली होती, अशीही माहिती मिळाली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी दिल्ली, मुंबई आणि पंजाबमधील रहिवासी आहेत. ते पाकिस्तानातील शहजाद भट्टी याच्या संपर्कात असल्याचेही समोर आले आहे. भारतात वेगवेगळ्या ठिकाणी दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा त्यांचा कट होता.
या आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांची झडती घेतली आहे. त्यात पोलिसांना 9 जणांकडे अनेक संशयित साहित्या आढळून आले आहे. त्यांच्याकडे दिल्ली, मुंबईतील अनेक ठिकाणचे व्हिडीओ आले आहेत. या व्हिडीओमध्ये दादर रेल्वे स्थानकाचेही व्हिडीओ आहेत. या व्हिडीओमध्ये अणुउर्जा केंद्र, विमानतळ, रेल्वेस्टेशन, विजनिर्मिती केंद्र टार्गेटवर होते. त्यांच्याकडे ग्रेनेड तसेच अनेय अत्याधुनिक शस्त्रं सापडली आहेत.
दरम्यान, हा कट उधळल्यानंतर आता दिल्ली, मुंबईतील पोलीस अलर्ट मोडवर गेले आहेत. पोलिसांकडून तपास यंत्रणेला अलर्ट राहण्याचे सांगण्यात आले आहे. दिल्लीत पकडण्यात आलेल्या 9 जणांची कसून चौकशी केली जात आहे. तसेच दिल्ली पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना व्यक्त केली जात आहे. अटक केलेल्या आरोपींकडून आणखी धक्कादायक माहिती समोर येते का? ते पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.