सैफ अली खान हल्ला प्रकरण !  हल्लेखोर शहजाद बाबत पोलिसांनी घेतला ''हा''मोठा निर्णय
सैफ अली खान हल्ला प्रकरण ! हल्लेखोर शहजाद बाबत पोलिसांनी घेतला ''हा''मोठा निर्णय
img
दैनिक भ्रमर
बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर टायच्या राहत्या घरी चोराने जीवघेणा हल्ला केला . या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. दरम्यान या प्रकरणातील हल्लेखोर शरीफुल इस्लाम शहजाद सध्या मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहे. अशातच आता याप्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे.

 सैफ अली खान याच्यावर हल्ला करणारा बांगलादेशी आरोपी शरीफुल इस्लाम शहजादची पोलिसांनी आरोपीची चौकशी केली यामध्ये त्याने अनेक मोठे खुलासे केले. त्याने सैफ अली खानच्या घरात घुसण्यापासून, हल्ला ते हल्ल्यानंतर कुठे गेला या सगळ्या घटनेचा खुलासा केला. 

सैफ अली खान हल्लेखोर आरोपी शरीफुल इस्लाम शहजादची पोलीस कोठडी वाढवण्यात आली आहे. 29 जानेवारीपर्यंत त्याची पोलीस कोठडी वाढवण्यात आली आहे. यापहिले त्याला पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती, जी 26 जानेवारीपर्यंत होती. आता आणखी 29 तारखेपर्यंत त्याला कोठडीतच मुक्काम करावा लागणार आहे.

दरम्यान, आरोपीने नवीन वर्षाच्या रात्री आणि 1 जानेवारीला वांद्रे आणि खारमधील हाय-प्रोफाइल भागांची पाहणी केली. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्याकडे घर फोडण्यासाठी स्क्रू ड्रायव्हर, हातोडा, ब्लेड अशी हत्यारे होती. ज्या चाकूने सैफ अली खानवर हल्ला करण्यात आला, तो चाकू ठाण्यातील एका रेस्टॉरंटमधून चोरीला गेला होता. गुन्हा केल्यानंतर दादरला जाणारी ट्रेन पकडण्यापूर्वी तो वांद्रे-खारमध्ये काही तास थांबला होता. तोपर्यंत त्याला माहित नव्हते की त्याने एका प्रसिद्ध अभिनेत्याला भोसकले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group