दीपिका-रणवीर झाले आईबाबा ! अभिनेत्रीने दिला गोंडस मुलीला जन्म
दीपिका-रणवीर झाले आईबाबा ! अभिनेत्रीने दिला गोंडस मुलीला जन्म
img
दैनिक भ्रमर
अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या घरात चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. बॉलीवूडमधील फेमस  कपल दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग आई-बाबा झाले आहेत. दीपिका आणि रणवीर दोघं देखील पहिल्यांदा आई-बाबा होण्यासाठी खूप उत्सुक होते. दीपिका आई झाल्याचं समोर आलं आहे. दीपिका आणि रणवीरच्या घरी लक्ष्मी आली आहे. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्याच दिवशी, आज अभिनेत्रीने गोंडस मुलीला जन्म दिला आहे, असं वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे. 

गेल्या कित्येक महिन्यांपासून दीपिकाच्या प्रेग्नेंसीची चर्चा सुरू होती. दीपिका कधी आई होणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं.  यावर्षी फेब्रुवारी महिन्यात दीपिकाने गरोदर असल्याचं जाहीर केलं होतं. सप्टेंबर महिन्यात बाळाचा जन्म होणार असंही तिने म्हटलं होतं. अखेर गणेशोत्सव काळात दीपिका आणि रणवीर सिंहच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. लग्नाच्या सहा वर्षांनंतर हे दोघं आई-बाबा बनले आहेत. रणवीर आणि दीपिकाने 2018 मध्ये इटलीत लग्न केलं होतं. सात वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर हे दोघं लग्नबंधनात अडकले होते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group