'माझं हार्दिक पांड्यावर प्रेम....' बॉलिवूड अभिनेत्री नेमकं काय म्हणाली?
'माझं हार्दिक पांड्यावर प्रेम....' बॉलिवूड अभिनेत्री नेमकं काय म्हणाली?
img
Dipali Ghadwaje
टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविकने यांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 18 जुलै रोजी सोशल मीडियावर पोस्ट करत हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविकने घटस्फोट घेत असल्याची माहिती दिली. 

नताशासोबत घटस्फोट झाल्यानंतर प्रसिद्ध गायक जास्मिन वालिया आणि हार्दिक पांड्या एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. दोघांचे एकाच ठिकाणावरील फोटोही समोर आले होते. आता याचदरम्यान बॉलिवूड अभिनेत्रीने हार्दिक पांड्याबाबत केलेल्या विधानाची चर्चा रंगली आहे. 

बॉलिवूड अभिनेत्री इशिता राजने दिलेल्या एका मुलाखतीत हार्दिक पांड्यावरील प्रेम व्यक्त केलं आहे. हार्दिक पांड्या माझा आवडता क्रिकेटपटू असल्याचं इशिता राजने म्हटलं आहे. जेव्हा इशिताला हार्दिकबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा इशिता म्हणाली की, तो एक महान क्रिकेटर आणि अष्टपैलू खेळाडू आहे. त्याला फलंदाजी करताना पाहणे खूप मजेदार आहे. होय, माझं त्याच्यावर प्रेम आहे, हार्दिक पांड्या माझा क्रश आहे. मला तो खूप आवडतो, असं इशिता राजने सांगितले. 
 
हार्दिक पांड्याने एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोमध्ये आजूबाजूचे दृश्य आणि जास्मिनने पोस्ट केलेल्या फोटोतील दृश्य एकच असल्याचं दिसून आले. जस्मिनच्या या पोस्टवर हार्दिकने कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी, हार्दिकने जास्मिनचे अलीकडील सर्व फोटो लाईक केले आहेत. विशेष म्हणजे दोघेही एकमेकांना इन्स्टाग्रामवर फॉलो करतात, यामुळे दोघंही एकमेकांना डेट करत असल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात आला.  

कोण आहे जास्मिन वालिया?

जास्मिन वालिया ही एक ब्रिटिश गायिका आणि टीव्ही स्टार आहे, जिची चर्चा म्युझिक इंडस्ट्रीपासून ते सोशल मीडियापर्यंत सर्वत्र होते. लंडनमधील एसेक्समध्ये जन्मलेल्या जास्मिनचे आई-वडील भारतीय वंशाचे आहेत. 'द ओनली वे इज एसेक्स' या ब्रिटीश रियॅलिटी टीव्ही मालिकेचा भाग बनल्यानंतर जास्मिनने पहिल्यांदा जगाचे लक्ष वेधून घेतले होते. जास्मिननने पहिल्यांदाच जॅक नाईटसोबत परफॉर्म केले आणि 2018 मध्ये 'सोनू के टीटू की स्वीटी' या बॉलिवूड चित्रपटासाठी 'बम डिगी डिगी बम' या गाण्याचा रिमेक करण्यात आला, तेव्हा तिची लोकप्रियता अधिकच वाढली. जास्मिन सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असून इन्स्टाग्रामवर तिचे 6.4 लाख फॉलोअर्स आहेत. युट्यूबवर जास्मिनला 5.7 लाख लोकांनी सबस्क्राईब केले आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group