आशिया कपची वाट बघणाऱ्या क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. आशिया काप फक्त १ महिना अंतराच्या दूर आहे. आशिया कप 2025 सुरू होण्यास आता फक्त एक महिना उरला आहे. ज्यामुळे भारतीय संघ जोरदार तयारीला लागला आहे. आशिया कप 2025 ची सुरुवात 9 सप्टेंबरपासून युएईत होणार असून ही स्पर्धा 21 दिवस चालेल. मात्र, या मोठ्या स्पर्धेपूर्वी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) आणि टीम व्यवस्थापन फक्त नेट प्रॅक्टिस आणि खेळाच्या रणनीतीवरच नव्हे, तर खेळाडूंच्या फिटनेस रिपोर्टवरही विशेष लक्ष ठेवत आहे.
श्रेयस अय्यरने आपला फिटनेस टेस्ट पूर्ण केला आहे. 27 ते 29 जुलै दरम्यान झालेल्या या परीक्षेत त्याने चांगली कामगिरी केली. गेल्या वर्षी तो टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळला नसला तरी आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमधील दमदार कामगिरीमुळे त्याच्या आशिया कप संघात परत येण्याच्या शक्यता वाढल्या आहेत. हार्दिक पांड्याची फिटनेस टेस्ट अद्याप बाकी आहे. त्यामुळे तो अजून वेटिंगवरच आहे. त्याची फिटनेस टेस्ट 11 आणि 12 ऑगस्ट रोजी NCA, बंगळुरूमध्ये होणार आहे.