१ ऑगस्ट २०२४
भारताचे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेपटू व भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक अंशुमन गायकवाड (वय ७१) यांचे काल निधन झाले.
अंशुमन गायकवाड यांनी रक्ताच्या कर्करोगाशी दीर्घ काळ संघर्ष केला. लंडनमधल्या किंग्स कॉलेज रुग्णालयात त्यांच्यावर नुकतेच उपचार करण्यात आले होते. गेल्याच महिन्यात ते लंडनमधून भारतात परतले. पण गायकवाड यांची कर्करोगाशी सुरू असलेली झुंज अखेर अयशस्वी ठरली.
गायकवाड यांनी आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत 40 कसोटी आणि 15 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी बीसीसीआयचे निवड समिती सदस्य म्हणूनही जबाबदारी सांभाळली. गायकवाड प्रशिक्षकपदी असताना भारतीय संघ 2000 साली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत उपविजेता ठरला होता.
Copyright ©2024 Bhramar